सलग 9व्या दिवशीही रजनीकांतच्या 2.0 ची प्रेक्षकांवर जादू कायम

मागच्या आठवड्यात शुक्रवारी सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षयकुमार यांचा प्रदर्शित झालेला 2.0 हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाल करत आहे. विदेशात ही 2.0 हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. चित्रपटाने फक्त 9 दिवसातच कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

2.0 ने 9 दिवसातच जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाने वर्ल्ड वाईड 500 कोटींचा आकडा देखील पार केला आहे. या संदर्भात चित्रपटाचा निर्माता करण जोहरने ट्विट करत आनंद देखील व्यक्त केला आहे. 2.0 ने फक्त हिंदीमध्ये 9 दिवसात 145 कोटींची कमाई केली आहे.

-Ads-

अक्षय कुमारने या चित्रपटाद्वारे साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. त्याच बरोबर तो पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत आहे.  2.0 हा अक्षय कुमारच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)