बदलापुर-2 सिनेमातही ‘वरूण धवन’चीच वर्णी 

मुंबई – बाॅलीवूडचा चाॅकलेट हीरो म्हणून अोळख असलेला ‘वरूण धवन’ हा आपल्या ‘बदलापुर’ या पहिल्या सुपरहिट सिनेमाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच ‘बदलापुर-2’ मध्ये सुध्दा काम करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

वरूण धवन याची भूमिका असलेल्या ‘बदलापूर’ सिनेमाचा दूसरा भाग बनविण्याची तयारी सुरू झाली आहे. बदलापुर सिनेमाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी यासंदर्भात स्पष्ट केले आहे. सिनेमाची स्क्रिप्ट लिहण्याचे काम चालू असून ‘बदलापुर-2’ हा  ‘बदलापुर’ चा सिक्वेल असणार नाही. ‘बदलापुर-2’ या सिनेमाची निर्मिती दिनेश विजन हे करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माहितीनुसार, ‘बदलापुर-2’ या सिनेमाची कथा पहिल्या भागाच्या पुढची कथा असणार नाही. ‘बदलापुर-2’ या सिनेमाची स्टोरी पूर्णपणे वेगळी असून नवीन कथा असल्याचे समजतं आहे. सिनेमाचं शूटिंग सुरू होण्याची घोषणा ही आगामी वर्षात केली जाणार आहे. ‘बदलापुर-2’ मध्ये वरूण धवन याच्यासह नवाजुद्दीन सिध्दीकी, राधिका अापटे आणि हुमा कुरैशी असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)