आयुष्यमान खुरानाचा ‘बधाई हो’ सिनेमावर ‘यांनी’ लावला कथा चोरल्याचा आरोप

नवी दिल्ली – मागील आठवड्यात प्रदर्शित झालेला आयुष्यमान खुराणा आणि सान्या मल्होत्रा यांचा सिनेमा ‘बधाई हो’ सुपरहीट ठरला आहे. २० कोटीच्या खर्चातून बनलेल्या या चित्रपटाने तिकीट खिटकीवर देखील आपली मक्तेदारी बनवली आहे. या चित्रपटाने चार दिवसात ४५. ०६ कोटी इतकी कमाई  केली आहे.

मात्र या सिनेमावर छत्तीसगड येथील लेखक आणि पत्रकार पारितोष चक्रवर्ती यांनी बधाई हो सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक यांच्यावर त्याची कथा चोरून सिनेमा केल्याचा आरोप लावला आहे. चक्रवर्ती यांनी रायपूर येथील पंडरी पोलीस स्टेशनमध्ये एक एफआयआर दाखल केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंडरी पोलीस स्टेशनचे प्रभारी सोनल ग्वाला यांच्या माहितीनुसार लिखित स्वरूपाची तक्रार मिळाली आहे आणि त्यावर चौकशी चालू आहे. त्यांनी म्हटलं आहे की, तक्रारीत पारितोष चक्रवर्ती यांनी आरोप लावला आहे की, 19 वर्षापूर्वी प्रकाशित कथासंग्रह घर बुनते हुए मध्ये समाविष्ट जड नावाची गोष्ट चोरून बधाई हो सिनेमा बनविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)