अक्षयच्या झोळीत बॅक-टू-बॅक 3 चित्रपट

खिलाडी अक्षय कुमारकडे एकापाठोपाठ एक तीन सिनेमे आहेत. त्याच्यासाठी ही दिवाळी बंपर ठरणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे फॉक्‍स स्टार स्टुडिओ आणि अक्षय कुमारच्या ‘कॅप ऑफ गुड फिल्म्स’ने 3 चित्रपट साईन केले आहे. या तिन्ही चित्रपटात अक्षय मुख्य भूमिका साकारणार आहे.

या प्रोजेक्‍टनुसार, अक्षयचा “मिशन मंगल’ चित्रपट असून या चित्रपटाची शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. हा चित्रपट भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित असणार असून “महिला मंडल’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे 1, 2 नव्हे तर तब्बल 7 कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटासाठी विद्या बालन, अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शरमन जोशी आणि नित्या मेनन या कलाकारांची निवड केली आहे. असे झाल्यास विद्या बालन आणि अक्षयची जोडी 11 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर दुसरीकडे तापसी आणि अक्षयची जोडीदेखील ‘बेबी’ आणि ‘नाम शबाना’सारख्या चित्रपटांतून एकत्र झळकली आहे. आता ही जोडी आणखी एका चित्रपटानिमित्त एकत्र येणार आहे. मंगळयान मोहिमेत महिलांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)