‘सिम्बा’ चा बॉक्स ऑफिस वर जोरदार धुमाकूळ

भारतातच नाही तर परदेशातही हा चित्रपट चांगला गाजतोय 

रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाचा मस्त तडका आणि रणवीर सिंगची पॉवर फुल्ल एनर्जी असणाऱ्या ‘सिम्बा’ चित्रपटला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. भारताप्रमाणे कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतून सुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिम्बा चित्रपट परदेशात जवळपास ९६३ स्क्रिनवर शुक्रवारी प्रदर्शित झाला असून , पहिल्या दोन दिवसातच चित्रपटाने अनपेक्षित कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सिम्बाचं आंतरराष्ट्रीय कलेक्शन हे जवळपास १३ कोटींच्या घरात गेले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच रोहित शेट्टीच्या चित्रपटाला मोठी ओपनिंग मिळाली असून, अमेरिका आणि कॅनडामध्ये पहिल्याच दिवशी एकूण ३ कोटी ४१ लाखांहून अधिकची कमाई सिम्बानं केली. ऑस्ट्रेलिया, फिजी मिळून कमाईचा आकडा हा एक कोटींहून अधिक आहे.

युएइमध्ये सहा कोटींहून अधिकची कमाई ‘सिम्बा’नं केली आहे. तसेच बाकीच्या देशांमध्ये हा कमाईचा आकडा जवळपास २ कोटी पर्यंत आहे. रोहित शेट्टी आणि ‘सिम्बा’च्या सर्व टीमसाठी हि आनंदाची बाब आहे. भारतातही या चित्रपटानं पहिल्या दिवशी २० कोटींची कमाई केली आहे.

सिम्बा’ चित्रपटात रणवीर सिंगबरोबर सारा अली खान, सिध्दार्थ जाधव, विजय पाटकर, नंदू माधव सोनू सूद, अश्विनी काळसेकर असे अनेक मराठी कलाकार सुध्या प्रमुख भूमिकेत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)