अखेर गोविंदाच्या ‘रंगीला राजा’ला सेन्साॅर बोर्डाचा हिरवा कंदील

अभिनेता गोविंदाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेली अनेक दिवस  सेन्साॅर बोर्डाच्या निर्णयामुळे अडकडून राहिलेला गोविंदाचा ‘रंगीला राजा’ या  चित्रपटाला सेन्साॅर बोर्डाने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे.

आता हा चित्रपट 11 जानेवरी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे निर्माता हे पहलाजी निहलानी हे आहेत. सेन्साॅर बोर्डाने चित्रपटातील तब्बल  20 दृष्ये वगळल्यानंतर पहलाज निहलानी यांनी कोर्टात देखील धाव घेतली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोविंदाचा शेवटचा चित्रपट ‘आ गया हिरो’ हा मागिल वर्षी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर गोविंदाचा एकही चित्रपट आला नव्हता. ‘आ गया हिरो’ देखील बाॅक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. ‘रंगीला राजा’मध्ये गोविंदाबरोबर मिसिका चौरसिया आणि अनुपमा अग्निहोत्री हे कलाकार सुध्दा काम करताना दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)