‘रणवीर सिंह’ बनणार ‘सलमान खान’चा स्पेशल गेस्ट

बॉलीवूडमधील दबंग अर्थात सलमान खान याचा रिअलिटी शो “बिग बॉस 12’ला सप्टेंबरमध्ये प्रारंभ झाला होता. या शोचा अखेरचा कार्यक्रम 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या ग्रॅड फिनाले शोमध्ये रणवीर सिंह स्पेशल गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहे.

या शोमध्ये रणवीर सिंह बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोहित शेट्टी सोबत एन्ट्री करणार आहे. अर्थात “बिग बॉस’मध्ये सलमान आणि रणवीर सिंह यांच्यातील जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच रोहित शेट्टीही या कार्यक्रमादरम्यान त्याच्या आगामी स्टंअ शो “खतरो के खिलाडी’ याच्या नवव्या सीजनची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. हा शो पुढील वर्षी 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, दीपिका आणि रणवीर हे दोघेजण इटली येथील लेक कोमो येथे 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी 13 तारखेला संगीत सेरिमनी आणि 1 डिसेंबरला मुंबईत रिस्पेशन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. लग्नानंतर रणवीर त्याच्या “सिम्बा’ चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. यात सारा अली खान मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)