जाणून घ्या… आमिर खानने अमिताभ बच्चन यांची ‘का’ मागितली माफी

नवी दिल्ली – यशराज फिल्मस चा बहुचर्चित सिनेमा ‘ठग्स आॅफ हिंदोस्ता’ प्रदर्शित होण्यापूर्वी या सिनेमातील कलाकार ‘आमिर खान’ आणि ‘अमिताभ बच्चन’ छोट्या पडद्यावर एकत्र दिसून आले. आमिर याने गुरूवारी टीव्हीवरील प्रसिध्द गेम शो कौन बनेगा करोडपती (केबीसी) याचे शूटिंग पूर्ण केले.

‘कौन बनेगा करोडपती’ शो अमिताभ बच्चन होस्ट करतात. दोन्हीही अभिनेत्यांनी एकसाथ ठग्स आॅफ हिंदोस्ता या त्यांच्या आगामी येणाऱ्या सिनेमांचे प्रमोशन केले. आमिर याने यावेळी दोघांचा एक सेल्फीसुध्दा घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा सेल्फी त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केला. आमीरने सेल्फी पोस्ट करत लिहिले आहे की, ‘मी आज खूपच चांगला दिवस घालवला. बच्चन यांच्यासोबत आताच केबीसी ची शूंटिग पूर्ण केले. खूप मज्जा आली बच्चन सर, फोटो पोस्ट करण्यास स्वतला रोखू शकलो नाही. त्यासाठी मनापासून माफी मागतो’.

नुकतेच या सिनेमाचे पहिले गाणे आणि सिनेमाचं ट्रेलर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले होते. प्रेक्षकांनी सिनेमातील पहिले गाणे ‘वाश्मल्ले’ यास चांगली पंसती दिली आहे. आता हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता सिनेमा चाहत्यांना लागून राहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)