क्रिकेटचा आनंद घेतेय – झुलन गोस्वामी

भारतीय वेगवान माऱ्याची प्रमुख गोलंदाज झुलन गोस्वामीने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापुर्वी बोलताना सांगितले की, टी-20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर मला एकदिवसीय क्रिकेटकडे जास्त प्रकर्षाने लक्ष देता येत असून मला माझ्या खेळाचा कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता आनंद घेता येतो आहे.

कारण टी-20 क्रिकेट साठी तुम्हाला खूप तंदुरूस्त आणि जास्त आक्रमक असावे लागते. मात्र, एकदिवसीय क्रिकेट मध्ये तुम्ही तंदुरूस्त आणि परिस्थीतीनुसार खेळत असता. त्यामुळे त्याचे दडपण तुमच्यावर कमी असते. जसे जसे तुमचे वय वाढत जाते तसे तसे तुम्हालाकाही गोष्टी लक्षात घेऊन खेळावे लागते त्यानुसार मी ही केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आणि माझा हा निर्णय माला योग्य आहे असे वाटते असेही तीने यावेळी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)