इंग्लीश प्रीमियर लीगच्या नवीन मोसमाची थाटात सुरुवात, पहिल्या सामन्यात मॅन युनाइटेड विजयी 

काल मध्यरात्री इंग्लिश प्रीमियर लीगच्या (इपीएल) नवीन मोसमाची सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात लोकप्रिय संघ मँचेस्टर युनाइटेडने २०१५-१६ मोसमाचे विजेते लेस्टर सिटीचा २-१ असा पराभव करत थाटात सुरुवात केली.
सामन्याच्या पहिल्या सत्राला सुरुवात होते न होते तोच मँचेस्टर युनाइटेडला पेनल्टी मिळाली. या पेनल्टीवर पॉल पोग्बाने गोल करत  युनाइटेड संघाला तिसऱ्याच मिनिटाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिल्या सत्रात आणखी गोल होऊ शकला नाही.
दुसऱ्या सत्रात देखील युनाइटेडचा दबदबा राहिला. लेस्टर सिटी गोल करून बरोबरी साधण्याच्या मानसुब्यात होती त्यामुळे ते आक्रमक चालींवर भर देत होते. त्यातच युनाइटेड संघाने संधी साधून ८३ व्या मिनिटाला गोल करत २-० अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल त्यांच्या विरोधात जाणार नाही याची काळजी घेतली. दुसरा गोल लुका शॉ याने नोंदवला.
दुसऱ्या सत्रात अन्य गोल होऊ शकला नाही. अतिरिक्त वेळेत लेस्टर सिटीच्या जिमी वार्डी याने गोल करत सामन्यात परतण्याच्या आशा निर्माण केल्या परंतु आणखी गोल करण्यात आलेल्या अपयशामुळे हा सामना  युनाइटेडने २-१ असा जिंकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)