नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने- पहिला कसोटी सामना

भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान सुरु झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीचा नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागल्याने कर्णधार जो रुटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅम येथील एजबस्टन येथे सुरु होत आहे. भारताच्या या इंग्लंड दौऱ्यातील टी -२० मालिका भारतीय संघाने जिंकली होती तर एकदिवसीय मालिकेमध्ये यजमान देशाचे पारडे जाड राहिले. कसोटी मालिका कोण जिंकणार याकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
या सामन्याची आणखी एक विशेष बाब म्हणजे हा इंग्लंडच्या संघासाठी १००० वा कसोटी सामना ठरणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)