विश्वचॅम्पियन होण्याचं भारतीय महिला संघाचे स्वप्न भंगले, उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव

अॅटिग्वा – आयसीसी टी20 महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतील लढतीत इंग्लंड महिला संघानी स्किव्हर आणि ए जोन्स यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाचा 8 विकेट राखून पराभव केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाचे विश्वचषक जिंकून विश्वविजेता होण्याचं स्वप्न तुटले आहे.

भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर 113 धावांच आव्हान उभं केल होत. मात्र विजयासाठीचे हे आव्हान इंग्लंडच्या महिला संघाने 17.2 षटकांत 2 बाद 116 धावां करत सहज पूर्ण केले. त्यामुळे इंग्लंड संघ आयसीसी टी20 महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. इंग्लंडकडून फलंदाजीत स्किव्हरने 52 आणि ए जोन्सने 53 धावा केल्या. भारतीय गोलंदाजीत दिप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

-Ads-

भारतीय महिला कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघास 19.3 षटकांत केवळ 112 धावा करता आल्या. भारतीय संघाकडून स्मृती मानधना 23 चेंडूंत 34 धावा करून झेलबाद झाली. त्यापाठोपाठ तानिया भाटियाही 11 धावांवर बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीतसुध्दा चांगली खेळी करू शकली नाही, ती 16 धावांवर बाद झाली. तर जेमिमा रॉड्रिग्ज ही 26 धावावर धावबाद झाली.

आयसीसी टी-20 महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला अनुभवी मिताली राज हिची उणीव जाणवली. भारतीय महिलांना इंग्लंड समोर मोठे लक्ष्य उभे करण्यात अपयश आले. स्किव्हर आणि ए जोन्स यांच्या शानदार खेळीच्या जोरावर अगदी सहजतेने इंग्लंडने भारतावर विजय संपादन करत अंतिम फेरी गाठली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)