इंग्लंडचा संघ विश्‍वचषक जिंकेल – सुनिल गावस्कर

मुंबई: सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाकडे विश्‍वचषक जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या मते यजमान इंग्लंड संघ हा यंदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.
2011 आणि 2015 च्या विश्‍वचषक स्पर्धेचा इतिहास पाहिल्यास यजमान देशांनी बाजी मारलेली आहे. त्यामुळे इंग्लंडला 2019 मध्ये जेतेपदाची अधिक संधी आहे. घरच्या वातावरणाची त्यांना योग्य जाण असल्याने यंदाच्या स्पर्धेत त्यांचे पारडे जड आहे, असे गावस्कर म्हणाले. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत विश्‍वचषक स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे खेळवण्यात येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)