इंग्लड विरुद्ध धोनी करू शकतो ‘हे तीन’ विश्वविक्रम !

नॉटिंगहॅम: टी-20 मालिकेत विजय मिळविल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघासमोर आज सुरू होत असलेल्या एकदिवसीय मालिकेत पुन्हा एकदा इंग्लंडचे जबरदस्त आव्हान आहे.

इंग्लंड सोबत होत असलेल्या ३ एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंह धोनी आपल्या नावे अनेक विक्रम करू शकतो. यामध्ये १०,००० धावा पूर्ण करणारा जगातील १२वा खेळाडू धोनी बनू शकतो. धोनीने आतापर्यंत ३१८ एकदिवसीय सामन्यात ९९६७ धावा बनविल्या आहेत. त्यामुळे त्याला हा विक्रम पूर्ण करण्यासाठी केवळ ३३ धावांची आवश्यकता आहे.

या व्यतिरिक्त इंगलंड विरुद्ध सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज म्हणून धोनी विक्रम करू शकतो यासाठी त्याला ९८ धावांची आवश्यकता आहे.

तसेच यष्टीरक्षक मध्ये सुद्धा धोनी नवीन विक्रम आपल्या नवे करू शकतो. विकेटच्या मागे ३०० झेलबाद पूर्ण करण्यासाठी धोनीला फक्त ३ झेल टिपावे लागतील. सध्या धोनीने २९७ झेल घेतले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)