असांज प्रत्यार्पणाबाबत इंग्लंडकडू आदेश

लंडन – विकीलीक्‍सचे सहसंस्थापक ज्युलियन असांज यांच्या प्रत्यार्पणासंदर्भात अमेरिकेने केलेल्या विनंतीला अनुसरून आदेश देण्यात आले आहेत, असे ब्रिटनचे गृहमंत्री सजिद जाविद यांनी सांगितले आहे. कॉम्प्युटर हॅकिंगबाबतच्या खटल्यासाठी असांज यांना अमेरिकेच्या स्वाधीन करण्यात यावे, अशी विनंती अमेरिकेने केली होती. आता असांज यांचे कायदेशीरपणे हस्तांतरण केले जाऊ शकेल का, याबाबतचा निर्णय ब्रिटनमधील न्यायालयाकडून उद्या (शुक्रवारी) घेतला जाणार आहे. हे हस्तांतरण कायदेशीर वैध ठरावे, यासाठी याबाबतच्या आदेशांवर आपण स्वाक्षरी केली असल्याचे जाविद यांनी सांगितले.

आजारी असल्याने वेस्टमिन्स्टर येथील कोर्टात गेल्या महिन्याच्या सुनावणीला असांज उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे पुढील सुनावणी बेलमार्श तुरुंगातच कडेकोट बंदोबस्तात केली जाणार आहे. भारताच्यावतीने दाखल झालेल्या विजय मल्ल्यांच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या मुख्य न्यायाधीशएम्मा आर्थबटन यांच्यासमोरच असांज यांचीही सुनावणी होणार आहे. भारत आणि ब्रिटनमधील प्रत्यार्पणाच्या करारापेक्ष अमेरिका-ब्रिटनमधील प्रत्यार्पणाचा करार खूपच सोप्या कायदेशीर प्रक्रियेचा आहे. या करारानुसार ब्रिटनच्य न्यायालयामध्ये सकृतदर्शनी प्रकरण सविस्तर मांडणे आवश्‍यक नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)