#WIvENG : वेस्टइंडिजचा पहिला डाव 154 वर आटोपला; दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड बिनबाद 19

सेंट लूसिया : इंग्लंडने वेस्टइंडिजविरूध्दच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 19 अशी मजल मारली आहे. त्यामुळे इंग्लंडची वेस्टइंडिजवर एकूण 142 धावांची आघाडी झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा सलामीवीर रोरी जोसेफ बर्न्स नाबाद 10 आणि कीटन जोनिंग्स नाबाद 8 धावांवर खेळत आहेत.

दरम्यान, वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 277 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात वेस्टइंडिजचा पहिला डाव 154 धावांवर आटोपल्याने इंग्लंडला 123 धावांची आघाडी मिळाली.

इंग्लंडकडून गोलंदाजीत मार्क वुड याने सर्वाधिक 5 तर मोईन अलीने 4 गडी बाद केले. स्टुअर्ट ब्राॅडने 1 गडी बाद केला. वेस्टइंडिज संघाकडून पहिल्या डावात जाॅन कैंपबेलने सर्वाधिक 41 आणि शेन डाॅरिच याने 38 धावा केल्या.

दरम्यान, तीन कसोटी सामन्याच्या क्रिकेट मालिकेत वेस्ट इंडिजने आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)