इंग्लडचा पहिला डाव 396 वर घोषित ; भारताचा दुसरा डाव सुरु

लंडन: जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्‍स यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या बहुमोल अखंडित भागीदारीमुळे इंग्लंडने चौथ्या दिवशी पहिल्या डावात 7 बाद 396 धावांची मजल मारताना भारतावर 289 धवांची आघाडी घेतली असून दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले.

दरम्यान, इंग्लडने चौथ्या दिवशी पहिला डाव 396 धावांवर घोषित केला. भारताची दुसरी डाव सुरु झाला असून इंग्लडने मुरली विजयच्या रुपात भारताला पहिला झटका दिला. भारत डावाने पराभवाची नामुष्की टाळू शकेल का?, हे आजच्या खेळावरून समजेल.

-Ads-

तत्पूर्वी पहिला कसोटी सामना 31 धावांनी जिंकून इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पावसामुळे या कसोटीतील पहिला संपूर्ण दिवस एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. त्यानंतर काल दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत पावसाचा व्यत्यय कायम राहिला होता.

तिसऱ्या सत्रात झालेल्या खेळात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारताचा पहिला डाव 35.2 षटकांत 107 धावांत गुंडाळताना या कसोटीवरही वर्चस्व मिळविले होते. जेम्स अँडरसनने 20 धावांत 5 बळी घेत ऐतिहासिक लॉर्डस मैदानावरील आपल्या बळींची संख्या 99 वर नेली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)