झेल सुटण्याची दोन्ही संघांसमोर समस्या: बेलिस 

बर्मिंगहॅम: वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यावर स्लिपमध्ये झेल सुटण्याची समस्या दोन्ही संगांसमोर सारखीच आहे. भारताकडून शिखर धवनने आणि इंग्लंडकडून डेव्हिड मेलनने एकापेक्षा अधिक झेल सोडले आणि तेही महत्त्वाच्या फलंदाजांचे. त्यामुळे दोन्ही संगांना तोटा झाला. परंतु पराभव टाळण्याचे दडपण असलेल्या भारतीय संघाला त्याचा स्वाभाविकपणेच अधिक फटका बसला.

बेलिस यांच्या मते इंग्लंड संघाचे क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचे आहे आणि या चुकांची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता नाही. तसेच आता मेलनला इंग्लंड संघात दुसऱ्या कसोटीसाठी स्थान मिळणे अवघड असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु शिखर धवनबाबत तसे म्हणता येणार नाही. भारताची संघनिवड चुकल्याची टीका अनेक माजी खेळाडूंनी केली आहे. दुसऱ्या कसोटीसाठी अंतिम 11 खेळाडूंचा संघ निवडण्याचे आव्हान भारतीय संघव्यवस्थापनावर आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)