SL vs Eng, 3rd Test : तिसऱ्या विजयासह इंग्लंडचा कसोटी मालिकेवर 3-0 ने कब्जा

कोलंबो – इंग्लंडने मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा 42 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली आहे. इंग्लंड संघाने  55 वर्षानंतर प्रथमच परदेशात  कसोटीत निर्भेळ यश मिळविले आहे. इंग्लंडने 1963 मध्ये न्यूझीलंडमध्ये 3-0 असा मालिका विजय मिळविला होता.

इंग्लंडने श्रीलंका संघास विजयासाठी 327 धावांचे आव्हान दिले होते. विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव 284 धावांवर आटोपला. त्यामुळे त्यांना 42 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

दुसऱ्या डावात इंग्लंडकडून गोलंदाजीमध्ये जॅक लिच आणि मोइन अली यांनी प्रत्येकी 4 विकेट घेत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. इंग्लंडच्या जाॅनी बेर्यस्टोला सामनावीर तर बेन फोक्स याला मालिकावीराचा किताब देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)