लंडन – इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचल्याचा सर्वाधिक फायदा येथील चाहत्यांना मिळणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपणासाठी त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
या स्पर्धेचे इंग्लंडमधील प्रक्षेपणाचे हक्क स्काय स्पोर्टसकडे आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांकरिता स्थानिक प्रेक्षकांना भरपूर शुल्क भरावे लागत होते. इंग्लंडचा संघ विजेता होईल अशी आशाही त्यांना वाटत आहे. त्यामुळेच चाहत्यांना आनंद देण्यासाठी त्यांनी विनाशुल्क प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला.