‘विजय माल्या’ला आणखी एक झटका, ‘बंगळूरू’मधील संपत्ती होणार जप्त

नवी दिल्ली – दिल्लीतील पटियाला हाउस न्यायालयाने फरार झालेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्या याला मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने विजय माल्याची बंगळूरू येथील संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने हा आदेश FERA (परकीय चलन नियमन कायदा) कायद्याचे उल्लघंन करण्याप्रकरणी दिला आहे.

दरम्यान ईडीने (Enforcement Directorate) एक अर्ज दाखल केला होता, त्यावर न्यायालयाने हा आदेश सुनावला आहे. ईडीने दाखल केलेल्या अर्जात म्हटलं होतं की, ‘विजय माल्या याला समन्स देण्यात आला होता. त्याच्या आॅफिस आणि घरावर नोटीस लावण्यात आलेली होती, तसेच माध्यमावर देखील जाहिरात दिली होती. पण तरीही विजय माल्या न्यायालयात हजर झाला नाही’.

-Ads-

असे केले नियमांचे उल्लघंन

ईडी चे म्हणणं आहे की, माल्याने 1996,1997 आणि 1998 मध्ये लंडन आणि युरोपिय देशामध्ये आयोजित फाॅर्मूला वन चॅम्पयिनशिपमध्ये किंगफिशर चा लोगो दाखवण्यासाठी एका ब्रिटीश फर्मला दोन लाख अमेरिकी डाॅलर दिले होते. ईडीच्या म्हणण्यानुसार माल्याने ही रक्कम रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय दिली होती. त्यामुळे हे परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लघंन ठरते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)