शत्रू मालमत्ता विकणार

1962 मध्ये चीन आणि 1965 व 1971 रोजी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धादरम्यान भारत सरकारने चीन आणि पाकिस्तानच्या नागरिकांची मालमत्ता मोठ्या प्रमाणात जप्त केली. या मालमत्तेचा आता सार्वजनिकरीत्या उपयोग केला जाणार आहे. सरकारकडे अशा सुमारे 9 हजार 400 मालमत्ता आहेत. त्याची किंमत एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

सरकारकडे शत्रूचे 3 हजार कोटींपेक्षा अधिक शेअर देखील आहेत. 1968 च्या द एनिमी प्रॉपर्टी ऍक्‍टनुसार अशा प्रकारच्या मालमत्तेची देखभाल केली जाते. द एनिमी प्रॉपर्टी अॅक्‍ट 2017 मध्ये संशोधन करण्यात आले. या सुधारणेनुसार पाकिस्तान आणि चीनमध्ये असलेल्या अशा नागरिकांच्या उत्तराधिकाऱ्यांना भारतात अस्तित्वात असलेल्या मालमत्तेवर अधिकार दाखविता येणार नाही. म्हणूनच आता सरकार ही मालमत्ता विकण्याच्या तयारीत आहे. गेल्या महिन्यात एक समिती नेमण्यात आली आणि त्यातून 20,323 शेअरधारकांचे 996 कंपनींचे 6.5 कोटी हून अधिक शेअर विकले. हे शेअर कस्टोडियन एनिमी प्रॉपर्टी फॉर इंडियानुसार कस्टडीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)