सातारा-कागल महामार्गाचे रखडलेले काम संपता संपेना

सातारा – पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागल या 133 किलोमीटर लांबीच्या सहापदरी रस्त्याचे काम रखडले आहे. गेल्या दीड वर्षांत निविदेला 13 वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी निविदा-पे-निविदा अशी स्थिती झाली आहे. मुदतवाढ केलेली निविदा 4 जानेवारी उघडण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यावेळी ही निविदा न उघडल्याने या निविदाला तारीख पे तारीख पडू लागली आहे. त्यातच आगामी निवडणुकीपूर्वी हे काम पूर्ण करायचे असल्याने अधिकारी आता कोड्यात सापडले आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) व राष्ट्रीय महामार्ग विभाग (एनएचएआय) यांच्यातील अंतर्गत वादामुळे टोल वसुलीच्या मुद्‌द्‌यावरून या निविदेला वारंवार मुदतवाढ देण्याचे काम मंत्रालय पातळीवरून होत आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग दुपदरीकरण काम पूर्ण : 2002, चारपदरी करण काम पूर्ण : 2005, सहापदरीकरण काम पूर्ण : 2022 म्हणजे (सध्या अपूर्ण) आहे.

पुणे ते बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरणाचे काम 2002 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यातील करारानुसार चौपदरीकरणाचे नियोजन झाले. त्याचवेळी चारपदरी व सहापदरी रस्त्यासाठी 60 मीटर रुंदीची जमीन राष्ट्रीय महामार्ग विभागाने अधिगृहण केली, तर राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 2005 पर्यंत चौपदरीकरण केले. बीओटी तत्त्वावर काम केल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाला या रस्त्यावर 2022 पर्यंत टोलवसुली करण्याची मुदत दिली. त्याचवेळी किणी आणि तासवडे या दोन टोलनाक्‍यांचा झाला.
2014 या रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत केले; पण कर्नाटकातील आणि महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दर्जाबाबत तुलना झाली. त्यामुळे पुणे-सातारा सहापदरीकरण टीकेचे लक्ष बनल्याने पुढील सातारा ते कागलपर्यंतचे सहापदरीकरण रखडले.

या कामाची निविदा वारंवार प्रसिद्ध झाली, प्रतिसादही मिळाला पण मंत्रालयस्तरावर निविदा खुल्या करण्यासाठी खो मिळत आहे. निवडणुकांपूर्वी हा रस्त्याचे काम पूर्ण करावयाचे असल्याने अधिकारी आता कोड्यात सापडले आहेत. वारंवार निविदेला मुदतवाढ मिळत असल्याने काही महिन्यातच हे काम पूर्ण करायचे आहे. आता निविदा कधी काढायची आणि काम कधी करायचे असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला आहे.

कागल ते हुबळी रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, सातारा ते कागल या 133 किमी रस्त्याचे रुंदीकरण अद्यापही रखडले आहे. वारंवार निविदा काढल्या जात आहेत. आतापर्यंत 13 वेळा निविदाला मुदतवाढ मिळाली हे एक दुर्दैव आहे. त्यामुळे त्वरित निविदा काढून काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

– चिन्मय कुलकर्णी, अध्यक्ष- संकल्प इंजिनिअरिंग सेवाभावी संस्था.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)