भिगवणची वाहतूककोंडी होणार दूर, हायवेलगतच्या स्टॉलवर पोलिसांची कारवाई

अतिक्रमाणामुळे वाहतूक कोंडीत भर..

शहरातील मुख्य बाजारपेठ, भैरवनाथ विद्यालय रोड दरम्यान वाहतूक कोंडीची मोठी ही समस्या भेडसावत आहे. मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, फुटवेअर, कपडे, फर्निचर, खाद्य पदार्थ आदींची येथे दुकाने आहेत. बहुतेक व्यापाऱ्यांनी वाढीव बांधकामे, अतिक्रमणे करून त्यांचे जाहिरात फलक आणि माल थेट पदपथांवर मांडलेला असतो, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

भिगवण – शहरातील पुणे-सोलापूर महामार्गालगत  सर्विस  रोड मधील दुभाजकामध्ये बसणाऱ्या स्टॉलवर आज गुरुवारी  (दि.22 नोव्हेंबर) रोजी भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात आली.

भिगवण शहराच्या मध्य भागातून जाणारा पुणे -सोलापूर महामार्गा लगतच्या सर्विस रोड आणि  दुभाजकाच्या मधोमधच भाजी मंडई आणि भांडी, फळांची दुकाने थाटली असल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत होती. याच ठिकाणी अनेक पार्किंगसाठी सर्विस रोडचा वापर केला जात असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली झाली होती. याकडे हायवे ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवाश्यांच्या त्रासात अधिकच भर पडली होती.

-Ads-

भिगवण नूतन पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी वाहतूक कोंडी आणि हायवेलगत यापूर्वी झालेले छोटे मोठे अपघात लक्षात घेता कारवाईला सुरुवात केली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भिगवणकरांनी साथ देणे आवश्यक आहे. सर्वांनी समंजसपणाने तोडगा काढल्यास वाहतूक कोंडी दुर होण्यास मदत होईल, असे ढवाण यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
30 :thumbsup: Thumbs up
25 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
4 :blush: Great
170 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)