एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. 4 जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला आहे. तो अद्याप स्वीकारला गेलेला नाही. प्रदीप शर्मा ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. 2008 मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलातून निलंबित झाले होते. नऊ वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजेच 2017 मध्ये ते पोलीस सेवेत पुन्हा रुजू झाले. 1983 मध्ये पोलीस दलात दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द वादात राहिली.

नव्वदच्या दशकात जेव्हा गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमाण वाढले होते तेव्हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी अनेक गुन्हेगारांना संपवले. प्रदीप शर्मा यांनी 132 एन्काऊंटरमध्ये भाग घेत 100 जणांचे एन्काऊंटर केले आहे. रामानारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या यांच्याशी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या आरोपातून त्यांना पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)