छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला, एक जवान जखमी

file photo

जगदलपूर – छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात आज सकाळी विधानसभा निवडणुकीच्या आधी एका मागोमाग एक असे सहा स्फोट नक्षलवाद्यांनी केले. ज्यामध्ये सीमा सुरक्षा दलाचे उप निरीक्षक महेंद्र सिंह जखमी झाले आहेत. तसेच बीजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूकीपूर्वी हिंसक पध्दतीने दहशत पसरविण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी कांकेर जिल्ह्यात एक मागे एक असे सहा स्फोट केले आहेत. तसेच बीजापूर जिल्ह्यात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तैनात असलेले सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत पोलिसांनी एका नक्षलवाद्याला कंठस्थान घातले. त्यानंतर त्याचा मृतदेह आणि हत्यारे ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

-Ads-

छत्तीसगड येथे 12 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात तर 18 नोव्हेंबर रोजी दुसऱया टप्प्यात मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला असतानाच राज्याच्या विविध भागात नक्षलवादी सक्रीय झाले आहेत. नक्षलवाद्यांनी सात दिवसात तिसरा हल्ला केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)