थेट विक्रीतून रोजगारनिर्मिती वाढणार 

मुंबई: कोणताही वितरक, दुकानदार आणि कोणत्याही एजन्सीशिवाय चालणाऱ्या, म्हणजेच थेट कंपनी ते विक्रेता यांच्या माध्यमातून चालणाऱ्या थेट विक्री व्यवसायामुळे येत्या 8 वर्षांमध्ये 1.8 कोटी रोजगार उपलब्ध होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. एखाद्या कंपनीचे उत्पादने थेट कंपनीतून मागवून विकायचे, असे या व्यवसायाचे स्वरूप आहे. हा व्यवसाय गृहिणीही उत्तमरीत्या करू शकतात. त्यामुळे हे क्षेत्र भारतात वेगाने वाढत आहे. डायरेक्‍ट सेलिंग उद्योग 2025 पर्यंत 65 हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. भारतात याच पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या ऍम्वे इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू बुधराजा यांनी सांगितले की, भारतातील थेट विक्री व्यवसायाची बाजारपेठ आज 8,400 कोटी रुपयांची आहे. पुढील 5 वर्षांत ती आणखी वेगाने वाढेल. महिलांना यात मोठ्या प्रमाणात व्यवसायाची संधी मिळणार असून, असल्याचेही बुधराजा यांनी सांगितले. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)