नियमभंग करणाऱ्या “त्या’ कंपन्यांवर होणार कारवाई

पुणे – निधीची रक्कम दरमहा भरण्यासाठी ठराविक कालावधी दिलेला असतानाही आणि यापूर्वी समज देऊनही शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पन्नास कंपन्यांनी त्याची दखल घेतली नाही. प्रशासनाच्या वतीने त्यांना अंतिम स्मरणपत्रे पाठविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी डेडलाईन दिली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा पीएफ प्रशासनाने दिला आहे.

भविष्य निर्वाह निधी कार्यालयासाठी केंद्र शासनाच्या वतीने नियमावली तयार केली आहे. ही नियमावली सर्वांसाठी बंधनकारक आहे. शासकीय आणि खासगी संस्थांना त्यांच्या कामगाराच्या पगारातून ठराविक रक्कम कापून घेण्याचा आणि त्यामध्ये संस्थेनेही तेवढीच रक्कम टाकावी ही बाब या नियमावलीत तयार करण्यात आली आहे. या सर्व ठेवींवर केंद्र शासनाच्या वतीने त्या त्या प्रवर्गानुसार व्याज देण्यात येते. त्यामुळे प्रशासनाकडे ही रक्कम जमा करण्यासाठी ठराविक कालावधी ठरवून दिला आहे. मात्र, बहुतांश कंपन्या प्रशासनाच्या वतीने या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कंपन्यांना सातत्याने स्मरणपत्रे पाठवूनही त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे या कंपन्यांना अंतिम स्मरणपत्रे पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यांना त्यासाठी अंतिम डेडलाईन देण्यात आली आहे, या मुदतीत त्यांनी त्याची पूर्तता न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पीएफ कार्यालयाच्या समन्वयिका नीलम कुलकर्णी यांनी दिली.

-Ads-

कारवाईचे स्वरुप आणखी तीव्र करणार
कामगारांना या निधीचा पूरेपूर उपयोग व्हावा, या उदात्त हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र शासन आणि प्रशासनाच्या वतीने नियमावलीही तयार करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याची आवश्‍यकता असते. मात्र; बहुतांशीवेळा खासगी कंपन्यांच्या वतीने या नियमांची अंमलबजावणीच होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा फटका सर्वसामान्य कामगारांना सोसावा लागत आहे, ही बाब लक्षात घेऊनच कारवाईचे स्वरुप आणखी तीव्र करण्यात येणार आहे, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)