फ्रान्समध्ये आणीबाणी?

पॅरिस: फ्रान्समध्ये सुरु असलेल्या जनआंदोलनाला हिंसक वळण लागले असून गेल्या दशकातील सर्वात मोठ्या नागरी असंतोषाला थांबण्यासाठी फ्रेंच सरकार आणीबाणी लागू करण्याच्या विचाराधीन असल्याचे वृत्त आहे. सरकारकडून आंदोलनकर्त्यांना शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याची माहिती सरकारी प्रवक्ते बेंजामिन ग्रिवेक्स यांनी दिली.

शनिवारी रात्री तोंडावर मास्क बांधून मध्य पॅरिसमध्ये आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी इमारती आणि वाहनांना आगीच्या हवाली केलं.

-Ads-

याबाबत बोलताना ग्रिव्हॉक्स म्हणाले की, “या गोष्टी पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी घेण्यासाठी आम्हाला विचार करावा लागेल.”

दरम्यान फ्रांसमध्ये इंधनावरील कर आणि वाढती महागाई याविरोधात दोन आठवड्यांपूर्वी देशभरामध्ये आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध म्हणून देशभरातील गाड्यांमध्ये फ्लोरोसेंट रंगाची जॅकेट्स ठेवली होती.

दंगलींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी आपातकालीन बैठक आयोजित केली आहे,


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)