शिक्षक पुरस्काराबाबत सदस्यांची बैठकीत नाराजी

जावली पंचायत समिती मासिक सभा

मेढा – जावली पंचायत समितीच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार या वर्षी सतरा शिक्षकांना दिले गेल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त करून पात्रता नसताना हे पुरस्कार दिल्याचा आरोप पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. तसेच ही पुरस्काराची यादी वाढली कशी आम्हाला काहीच माहिती नाही असे म्हणून गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जावली पंचायत समितीची मासिक सभा आखाडकर सभागृहात सभापती अरूणा शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला सदस्य विजयकुमार सुतार, सौरभ शिंदे, कांताबाई सुतार, लेखा व वित्त आधिकारी काळोखे, अतिरिक्त गट विकास अधिकारी संताजी पाटील आदी उपस्थित होते.मात्र अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती. शिक्षण विभागाच्या चर्चेत गट शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण शिक्षण विभागाची माहिती देत असताना सदस्य सौरभ शिंदे यांनी अनेक प्रश्‍न उपस्थीत केले. तसेच निवड प्रक्रीये बद्दल विचारणा केली.तसेच पात्रतेचा प्रश्‍न ही उपस्थीत केला. आदर्श शिक्षकांच्या पुरस्काराच्या खिरापती वाटल्या जातात असे ही शिंदे म्हणाले.

बैठकीला वीज वितरणचे अधिकारी प्रशांत गाडे आढावा देण्यासाठी उशिरा पोहोचले त्यावर बैठकीला साडेअकारानंतर कुठल्याही अधिकाऱ्यांनी येऊ नये अशी तंबी सभापती अरुणा शिर्के यांनी दिली. यावेळी बांधकाम विभागाचे कृष्णात निकम यांनी कुसुंबी-कोळघर रस्त्याचे काम प्रगती पथावर असल्याचे सांगीतले. यावेळी पंचायत समिती सेसमधून वाटप करण्यात येत असलेल्या शिलाई मशीनचे फॉर्म परस्पर लोकांना बाहेर न देता इथून पुढे सदस्यांना विचारल्या शिवाय फॉर्म देण्यात येवू नयेत अशा सूचना दिल्या. तसेच यावेळी विविध विभागांचा आढावा यावेळी घेण्यात आला. लेखा व वित्त अधिकारी काळोखे यांनी मार्गदर्शन केले. अतिरिक्त गट विकास अधिकारी संताजी पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)