Elgar Morcha; मुख्यमंत्र्यांचे प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी निमंत्रण

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाने एल्गार मोर्चाचं आयोजन केले आहे. जिजामाता उद्यान ते विधान भवन दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी निमंत्रण पाठवले आहे. त्यानुसार आता मोर्चाचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आझाद मैदानावर आंदोलक जमण्यास सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी  संभाजी भिडेंची अटक टाळण्यात नरेंद्र मोदींचा हस्तेक्षप केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता तसेच सरकार संभाजी भिडे यांना जावया सारखी वागणूक का देते असा सवालदेखील त्यांनी केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)