शास्ती विरोधात एल्गार

आंदोलनात राजकारण आणू नये : संदीप बेलसरे
शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे शास्ती मुक्‍त करावीत.
1 ऑगस्ट 2019 पर्यंतची सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करावीत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपने नागरी समस्या सोडवाव्यात.
या आंदोलनात कोणतेही राजकारण आणू नये.
महापालिका सभागृहात शास्तीमाफीचा प्रस्ताव मंजूर करावा.

मेळाव्यात पारित केलेले प्रस्ताव

पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष यांनी या आंदोलनात कुणीही राजकारण आणू नये, असे आवाहन केले. तसेच आंदोलनाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न झाल्यास किंवा आंदोलनात राजकारण आणल्यास, आम्हाला वेगळा मार्ग निवडावा लागेल, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी नेते मंडळींना दिला.

पिंपरी – शास्तीकरा विरोधात नागरिकांचा रोष पुन्हा एकदा धगधगू लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या घटनाक्रमामुळे शास्तीची धग जास्तच जाणवत आहे. शहरातील शास्तीबाधितांनी महापालिकेविरोधात एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शास्तीविरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतर्फे पहिले पाऊल म्हणून येत्या गुरुवारी (दि.25) आकुर्डीतील खंडोबा मंदिरापासून महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. तसेच महापालिका मुख्यालयासमोर शास्तीच्या नोटीसांची होळी केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील शास्तीबाधितांचा मेळावा गुरुवारी (दि.18) आकुर्डीतील खंडोबा मंदीर सांस्कृतिक भवनात पार पडला. यावेळी शास्तीबाधितांच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी शिस्तबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज असल्याचे मत व्यक्‍त करण्यात आले. त्यानुसार रेडझोनविरोधी कृती समितीच्या धर्तीवर शास्तीवरोधी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावाला सर्व उपस्थितांनी हात ऊंचावून पाठिंबा दर्शविला.

या मेळाव्याला माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक दत्ता साने, पंकज भालेकर, सचिन चिखले, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य धनंजय भालेकर, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, रेडझोन कृती समितीचे अध्यक्ष सुदाम तरस व शास्तीबाधित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या आंदोलनासाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनाचा मुहूर्त काढण्यात आला होता. मात्र, आंदोलनाची धग कायम ठेवण्यासाठी येत्या गुरुवारीच महापालिकेवर मोर्चा काढून शास्तीबाधितांची शक्‍ती दाखवून देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)