पुलवामा जिल्ह्यात धुमश्‍चक्री; काश्‍मीरात सात नागरीकांसह अकरा ठार

File photo...

चकमकीत तीन गनिमांचा खात्मा; एक जवानही शहीद

श्रीनगर: दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांचे जवान आणि गनिमांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन गनिमांचा खात्मा करण्यात आला तर सुरक्षा दलांचाही एक जवान शहीद झाला. चकमकीच्या ठिकाणी या कारवाईला विरोध करण्यासाठी नागरीकांचा मोठा जमाव जमला होता. हा जमाव खूपच आक्रमक झाल्याने त्यांना आवर घालण्यासाठी कराव्या लागलेल्या गोळीबारात सात नागरीक ठार झाले. त्यामुळे संपुर्ण काश्‍मीरातील स्थिती आता तणावपुर्ण बनली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज सकाळी सीरनु गावात हा प्रकार घडला. त्या गावात एकेठिकाणी गनिमांचा वावर असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्या परिसराला वेढा देऊन तेथे कॉम्बिंग ऑपरेशन हाती घेतले. या कारवाईत अडकलेल्यांमध्ये लष्करातून पळून गेलेला एक जवान झहुर अहमद ठोकर याचाही समावेश होता. त्याची माहिती गावकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी कारवाईच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमून जवानांवरच दगडफेक सुरू केली. प्रत्यक्ष गनिमांना टिपण्यात सुरक्षा जवानांना केवळ 25 मिनीटे लागली पण संतप्त जमावाला रोखण्याचे काम मात्र त्यांना अवघड गेले कारण लोकांनी लष्करी तसेच सुरक्षादलाच्या वाहनांचाहीं ताबा घेतला होता. त्यामुळे जमावाला काबुत आणण्यासाठी व स्वसुरक्षेसाठी गोळीबार करावा लागला त्यात तब्बल सात नागरीक ठार झाले असून अन्य काही जण जखमी झाले आहेत.

चकमकीत मारला गेला झहुर हा याच गावचा रहिवासी होता त्यामुळे नागरीक अधिकच बेभान झाले होते. झहुर हा लष्‌करातून आपली सर्व्हिस रायफल घेऊन फरारी झाला होता नंतर तो गनिमांना मिळाला होता. यात ठार झालेल्या अन्य दोन गनिमांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर काश्‍मीर खोऱ्यात अन्यत्र तणाव निर्माण होऊ नये म्हणून मोबाईल सेवा व इंटरनेट सेवा नियंत्रीत करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)