पुणे – प्रक्रिया “फेल’; वीजनिर्मितीचा “कचरा’

माहिती अधिकारातून उघड : 125 प्रकल्प अपयशी

पुणे – कचरा संकलनासाठी मिळकतकरामधून पैसे वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, दुसरीकडे संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यात महापालिका “फेल’ झाली आहे. माहिती अधिकारातून हे वास्तव उघड झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून याविषयीची माहिती ही नकारात्मकच येत असून 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंतची आकडेवारीही तेच दर्शवत असल्याचे सजग नागरिक मंचने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे मनपाने गेल्या काही वर्षांत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारे 25 प्रकल्प शहरातील अनेक भागांमध्ये उभारले आहेत. या निमित्याने शहरातील सुमारे 125 टन ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लागून त्यातून मनपाचा फायदा व्हावा, हा उद्देश होता. या प्रकल्पांवर सुमारे 16 कोटी रुपये खर्च झाले आहेत. देखभाल दुरुस्तीवर अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. मात्र त्यातून फलनिष्पत्ती मात्र शून्य आहे.

याशिवाय फुलेनगर येथील बायोगॅस प्रकल्प चालविण्याच्या कामाच्या निविदेला नुकतीच स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे. तांत्रिक छाननी समितीने या निविदेच्या पूर्वगणना पत्रकात 745 रुपये प्रतिटन एवढा दर देण्याचे मंजूर केले होते. त्या निविदेत पाच वर्षांसाठी 67 लाख रुपये खर्च येणार होता मात्र अचानकपणे टेंडर अटी /शर्ती मध्ये बदल करण्यात आला. कचऱ्याच्या प्रमाणात 745 रुपये प्रतिटन एवढा दर देण्याची अट काढून कवट 73.77 लाख रुपये (10.%) रुपये देण्याचे ठरवले गेले. यातही वास्तविक ज्या निविदा काढल्या जाणार आहेत त्या प्रतिटन बेसिसवर काढल्या गेल्या पाहिजेत, तरच यामध्ये महापालिकेचे नुकसान होणार नाही. आणि ज्या ठेकेदारांना यामध्ये काम मिळेल, त्यांचाच खिसा भरला जाणार नाही. मात्र, प्रशासनाकडून तसे केले जात नसल्याचा आरोप “मंच’चे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी केला आहे.

प्रकल्पनिहाय मिळालेली माहिती
बाणेर, हडपसर एक, हडपसर दोन, पेशवे पार्क एक आणि कात्रज रेल्वे म्युजियम हे चार प्रकल्प पूर्ण बंद होते. त्यामुळे या ठिकाणी एक टनसुद्धा कचरा पाठवला गेला नाही. तसेच गॅस आणि वीज निर्मिती झाली नाही. या सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ऑक्‍टोबर 2015 पासून हडपसर-1, हडपसर-2, पेशवे पार्क आणि कात्रज रेल्वे म्युजियम हे चार प्रकल्प बंद आहेत. तर बाणेर प्रकल्प जून 2017 पासून बंद आहे. तर येरवडा, वडगाव-1, वडगाव-2, घोले रस्ता, वानवडी या पाच प्रकल्पांत एक युनिटसुद्धा वीज निर्मिती झाली नाही. पेशवे पार्क दोन, फुलेनगर, वडगाव-1, वडगाव-2 या प्रकल्पांमध्ये 38% पेक्षा कमी कचरा जिरवला गेला. दररोज 125 टन कचरा जिरविण्याची क्षमता असणाऱ्या या 25 प्रकल्पांत मिळून सरासरी 65 % कचरा पाठवला गेला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)