नगरमध्ये घनकचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प : वाकळे

नगर – नगर शहरात लवकरच घनकचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचा मानस महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्‍त केला. नाशिकच्या धर्तीवर हा प्रकल्प नगरमध्ये उभारला जाईल, असे ते म्हणाले. वाकळे यांनी नाशिक महापालिकेने अंबड परिसरात उभारलेल्या घनकचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाला आज भेट दिली. तसेच पाहणी केली. त्यावेळी अशा प्रकारचा प्रकल्प नगरमध्ये उभारता येईल का याबाबत अधिकारी व पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा केली. यावेळी नाशिकच्या महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, प्रकल्प अधिकारी बाजीराव माळी, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष तुषार पोटे, युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य पुष्कर कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

नाशिक येथील भाजपच्या बैठकीसाठी वाकळे गेले असता त्यांनी घनकचरा प्रकल्प बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर असल्यामुळे अशा प्रकारचा प्रकल्प नगर शहरात उभारता येईल का याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. महापालिकेचे आरोग्य अधिकारी व घनकचरा संबंधी आरोग्य अधिकाऱ्यांना घेवून नाशिक व इंदौर महापालिकेचा दौरा करणार आहे. असे वाकळे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)