मोदी पुन्हा विजयी झाल्यास निवडणुका होणार नाहीत : गेहलोत

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा विजयी झाल्यास चीन आणि रशियाप्रमाणेच भारतात निवडणुका होण्याची शक्‍यता कमीच आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

मोदींच्या नेतृत्वात देश आणि लोकशाही धोक्‍यात आहे. पुन्हा सत्ता मिळण्यासाठी ते काहीही करू शकतात. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोदी पाकिस्तानशी युद्धही छेडू शकतात असे जनतेला वाटते, असे कॉंग्रेसचे नेते असणारे गेहलोत पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. मोदी हे चांगले अभिनेते आहेत. ते बॉलीवूडमध्ये अधिक चांगली कामगिरी करू शकले असते. खोट्या आश्‍वासनांचे मार्केटींग करण्यात ते तरबेज आहेत.

मात्र, देशाची जनता सुज्ञ असून ती खोटेपणा आणि खरेपणा यांतील फरक ओळखेल. मोदींनी त्यांच्या राजवटीत प्रशासनावर लक्ष देण्याऐवजी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांच्याकडे दाखविण्यासारखी कुठलीच कामगिरी नाही, अशी टीका गेहलोत यांनी केली. लोकशाहीत सहिष्णुता असायला हवी. पण, भाजप नेत्यांच्या डीएनएमध्ये सहिष्णुता नाही, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)