निवडणुका पुर्णपणे मुक्‍त निष्पक्ष होतील : सुनील अरोरा

निवडणूक आयुक्तपदाची सूत्र स्वीकारली

नवी दिल्ली: देशातील निवडणूका या पूर्णपणे मुक्‍त आणि निष्पक्षपातीपणे पार पाडल्या जातील. या निवडणूका नैतिकपूर्ण पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि मतदारांनी सहकार्य करायला हवे, असे नवनिर्वाचित मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले. त्यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्र स्वीकारली. पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणूकीची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. याशिवाय जम्मू-काश्‍मिर, ओडिशा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, अरूणाचल प्रदेश आणि सिक्‍काम विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडणार आहे. या सर्व राज्यात पुढील वर्षी निवडणूका होणार आहे.

-Ads-

अरोरा म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला प्राधान्य देणार आहे. ईव्हीएम, मतदार जनजागृती, मतदान प्रक्रिया यावर आपला विशेष भर असल्याचे त्यांनी सांगितले. सुनील अरोरा हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ओम प्रकाश रावत हे मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून शनिवारी निवृत्त झाले. अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी निवडणूक आयुक्त म्हणून रूजू झालेले अरोरा आता पुढील किमान तीन वर्षे तरी या पदावर कार्यरत राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)