शांततेत आणि निर्भयतेने मतदान पार पाडावे – नीलम गोऱ्हे

पुणे – महाराष्ट्रात आज लोकसभेच्या १४ जागांसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे लोकसभेसाठी त्यांच्या आई श्रीमती लतिकाताई गोऱ्हे यांच्यासह मॉडेल कॉलनी येथील विद्याभवन शाळेत मतदान करून हक्क बजावला. यावेळी बालताना त्या म्हणाल्या की, आज मतदान असल्याबाबत लोकांना माहिती असली तरी काही मतदान केंद्रामध्ये लोक आज बाहेर पडलले दिसत नाहीत. तरी नागरिकांना लवकरात लवकर बाहेर पडावे व आपले मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले.

२०१४ मध्ये मतांची टक्केवारी सर्वच मतदारसंघात वाढलेली मिळाली होती. यावेळेस देखील मतदानाची आकडेवारी वाढलेली मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही ठिकाणी जर मतदान केंद्रावर मतदान मशीन बाबत तक्रारी असतील तर त्याबाबत प्रशासनाला कळविण्याची विनंती आ.डॉ.गोऱ्हे यांनी केली. शांततेत आणि निर्भयतेने मतदान पार पडावे, अशी इच्छा व्यक्त केली.

बारामती लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना आ.डॉ.गोऱ्हे म्हणाला की, याठिकाणी नागरिकांमध्ये चैतन्य जाणवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदार संघात लक्ष घातलेले आहे. त्याचप्रमाणे या मतदार संघात समाजकंटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी व्यवस्था केली असल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)