लोकसभेबरोबर जम्मू काश्‍मीरमध्येही निवडणूकांची तयारी

नवी दिल्ली: जम्मू काश्‍मीरमधील विधानसभेसाठी लोकसभेच्या निवडणूकांबरोबरच निवडणूक घेण्याची सरकारची ईच्छा असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सांगितले. जम्मू आणि काश्‍मीरमध्ये गेल्या महिन्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मेहबुबा मुफ्ती सरकारचा भाजपने पाठिंबा काढल्यानंतर 6 महिने तेथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.

जर निवडणूक आयोगाला जम्मू काश्‍मीरमध्ये लोकसभा निवडणूकांबरोबरच निवडणूका घ्यायच्या असतील तर सरकारचा त्याला काहीही आक्षेप असणार नाही. निवडणूकीसाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व सुविधा केंद्राच्यावतीने पुरवण्यात येतील, असे सिंह यांनी सांगितले. जम्मू काश्‍मीरमधील राष्ट्रपती राजवटीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते.

“पीडीपी’बरोबर भाजपची आघाडी अनैसर्गिक होती, हा विरोधकांचा दावा राजनाथ सिंह यांनी फेटाळून लावला. तसेच अन्य पक्षांनी आघाडी करून सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांना केंद्र सरकारने अडथळा आणल्याचा आरोपही त्यांनी नाकारला. जम्मू काश्‍मीरमध्ये 1996 नंतर प्रथमच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)