264 ग्रामपंचायतींसाठी 24 फेब्रुवारीला निवडणूका; आचारसंहिता लागू

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला. कालावधी संपणाऱ्या 264 ग्रामपंचायतीसाठी 24 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 25 फेब्रुवारी रोजी निकालाची घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेमुळे संबंधित भागात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
हा निवडणूक कार्यक्रम मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींसाठी आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जांची प्रक्रिया संगणकाद्वारे राबविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील 90, रत्नागिरीमधील 40, सिंधुदुर्गमधील 1 अशा कोकण विभागातील 131 ग्रामपंचायती. तर धुळे 17, अहमदनगर 36 आणि नंदुरबारमधील 3 अशा नाशिक विभागातील एकूण 56 ग्रामपंचायती. तसेच पुणे 22, सोलापूर 5, सातारा 40 आणि कोल्हापूरमधील 5 अशा पुणे विभागातील एकूण 72 ग्रामपंचायती आणि औरंगाबाद विभागांतर्गत 2, अमरावती जिल्हा व विभागातील 2 ग्रामपंचायती, तर नागपूर विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 1 ग्रामपंचायतीचा या निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये समावेश आहे.

उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यासह निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी 13 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. रविवार, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसातपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे मतदान सकाळी साडेसातपासून ते 3 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)