निवडणूक यंत्रणेचा उडाला गोंधळ

अचानक यंत्रे बंद पडल्याने कर्मचाऱ्यांची पळापळ 
नगर –
नगर लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदानास सुरुवात झाल्यानंतर अचानक मतदान यंत्रे बंद पडल्याने निवडणूक यंत्रणेचा मोठा गोंधळ उडाला होता. सुरुवातीस घेण्यात येणाऱ्या मतदान चाचणी दरम्यान 187 केंद्रांमध्ये मतदान यंत्रेच सुरू झाली नव्हती. त्यानंतरही मतदान केंद्र सुरू असताना सकाळी अकरा वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली. नगर दक्षिण मतदार संघात आतापर्यत 396 मतदान यंत्रे बदलण्यात आली. त्यामुळे निवडणूक यंत्रणेचा मोठा गोंधळ उडाला. हे यंत्र तातडीने बदल्यात आली.

मांडवा येथे मशिनमध्ये वारंवार बिघाड झाल्याने मतदारांना 1 तासाहून अधिक काळ हाल सोसावे लागले. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत मतदारांनी रांगांमध्येच विश्रांती घेतली. तसेच जामखेड तालुक्‍यातील नान्नज, मुंगेचीवाडी, खर्डा येथेही 2 तासांपेक्षा जास्त वेळ मतदान यंत्रे पडली होती. त्यामुळे मतदार यंत्र सुरू होण्याची वाट पाहत मतदार शाळेच्या पडवीत बसले होते. तसेच खराब झालेली यंत्रे तातडीने बदलून देण्यात आली. अहमदनगर एम. आय. डी. सी. येथील गोदामातून ज्या ठिकाणच्या यंत्रांमध्ये दोष निर्माण झाले आहेत, तेथे पर्यायी यंत्रे पोहोचविली जात होती. बिघडलेले यंत्र बदलण्यात वेळ गेल्याने मतदारांना अनेक ठिकाणी ताटकळत उभे राहवे लागल्याने काहींनी नाराजी व्यक्‍त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)