निवडणूक कार्यशाळेसाठी ७८ राजकीय पक्षांना आमंत्रण

पुणे विभागीय निवडणूक कार्यशाळा शनिवारी

पुणे – राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुणे विभागीय निवडणूक कार्यशाळा येत्या शनिवारी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत निवडणुकीसंदर्भातील कायदे, विविध प्रकारच्या तरतुदी, निवडणुकीतील खर्च, निवडणुकीबाबत करावयाच्या सुधारणा, निवडणुकीत केला जाणारा पैशांचा वापर आणि बळाचा वापर आदी विषयांवर तज्ञांची व्याख्याने होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यशाळेसाठी 78 नोंदणीकृत राजकीय पक्षांना आमंत्रित करण्यात आले, अशी माहिती विभागीय उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांनी दिली. विधानभवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चव्हाण यांनी ही माहिती दिली. यावेळी तहसिलदार विकास भालेराव उपस्थित होते.

यावेळी चव्हाण म्हणाले, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने ही कार्यशाळा होत आहे. यामध्ये “सशक्‍त लोकशाहीसाठी उत्कृष्ट निवडणुका’ आणि “राजकीय पक्षाद्वारे सशक्‍त लोकशाही’ या विषयावर व्याख्याने होणार आहेत. तर लोकशाही, निवडणूक आणि सुशासन’ या विषयांच्या अनुषंगाने माहिती दिली जाणार आहे.

या कार्यशाळेमध्ये शासकीय अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माजी सनदी अधिकारी यांचीसुध्दा व्याख्याने होणार आहेत. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकरी नवल किशोर राम उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)