निवडणूक ज्ञान

निवडणूक, मतदान यातील अनेक कायदेशीर तरतुदींबाबत सर्वसामान्य मतदारांना पुरेसे ज्ञान नसते. वास्तविक, निवडणूक आयोगाकडून याबाबत वेळोवेळी माध्यमांमधून, पुस्तिका काढून माहिती प्रसिद्ध केली जात असते. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही याबाबतची माहिती उपलब्ध आहे. त्यातून सर्वसामान्यांच्या सर्व प्रश्‍नांचे, शंकांचे निराकरण केले जाते.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते?
– नामनिर्देशन पत्राच्या पडताळणीच्या दिवशी उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा कमी नसावे. यासाठी भारतीय संविधानाचे कलम 84 (ब) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 36 (2) संविधानाच्या कलम 173 (ब) मध्ये विस्तृत माहिती दिली आहे.

कुठल्याही मतदारसंघात मतदार म्हणून नोंद नसल्यास अशा वेळी ती व्यक्‍ती निवडणूक लढवू शकतो का?
– नाही. निवडणूक लढवण्यासाठी चालू मतदार यादीत मतदार म्हणून या व्यक्‍तीची नोंद असली पाहिजे.
(संदर्भ : लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 4 (ड) आणि कलम 5 (क))

ठराविक राज्यात मतदार म्हणून एखाद्याने नोंदणी केली असेल तर त्या राज्याच्या व्यतिरिक्‍त दुसऱ्या राज्यातून सदरची व्यक्‍ती निवडणूक लढवू शकते का?
– होय. आसाम, लक्षद्वीप आणि सिक्‍कीमच्या स्वायत्त जिल्ह्यांव्यतिरिक्त देशातील कुठल्याही मतदारसंघातून सदर व्यक्‍ती निवडणूक लढवू शकतो. (संदर्भ : लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 4)

ठराविक राज्यात एखादी व्यक्ती अनुसूचित जातीचा सदस्य आहे. दुसऱ्या राज्यात अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर तो लोकसभेसाठी निवडणूक लढवू शकतो का?
होय. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या कुठल्याही राज्यातील जागेवरून तो निवडणूक लढवू शकतो.
(संदर्भ: लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 4)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)