उत्तरप्रदेश – 2019 लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला आज सर्वत्र जोरदार सुरवात झाली आहे. सातव्या टप्प्यात एकूण 59 जागांसाठी हे मतदान होत असून एकूण 918 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील 246 गोखपूर मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर आदित्यनाथ योगी यांनी पत्रकारांशी देखील सवांद साधला.
‘निवडणुक ही लोकशाहीतील एक उत्सव असून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले आहेत’. असं योगी म्हणले.सातव्या टप्प्यात सात राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान होत आहे. यामध्ये बिहारमध्ये 8, हिमाचल प्रदेशमध्ये 4, झारखंड 3, मध्य प्रदेशात 8, पंजाब 13, उत्तर प्रदेश 13, पश्चिम बंगाल 9 तर चंदीगड एका जागेवर मतदान पार पडणार आहे. सुमारे दहा कोटी मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.