इलेक्शन याद्यांमध्ये सावळा गोंधळ यादीत तब्ब्ल १४१ वर्षांचा मतदाता!

हरारे: झिंबाब्वे मध्ये ३० जुलै रोजी निवडणूक होणार आहे. रॉबर्ट मुगाबे यांची ३७ वर्षांच्या प्रदीर्घ राजवट सैन्याने संपुष्ठात आणल्यानंतर झिंबाब्वे मध्ये काही दशकांनंतर पहिल्यांदाच मुगाबे यांना वगळून निवडणूका होत आहेत. परंतु निवडणूक याद्यांमध्ये झालेल्या सावळ्या गोंधळामुळे झिंबाब्वे मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

झिंबाब्वे मधील प्रमुख विरोधी पक्षाने याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून याविरोधात देशाची राजधानी हरारे येथे आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. तत्पूर्वी गेल्या नोव्हेंबर महिन्यात माजी पंतप्रधान रॉबर्ट मुगाबे यांना सैन्याने सक्तीने पदावरून हटवल्यानंतर पंतप्रधान म्हणून इमर्सन मनंगावा काम पाहत आहेत. निवडणूक आयोगाने झिंबाब्वेमध्ये पारदर्शक निवडणूका घेणार असल्याची ग्वाही दिली होती मात्र आता हा प्रकार समोर आल्याने निवडणुकांच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)