…तर निवडणूक आयोगाने ‘ही’ निवडणूक रद्द करावी – शरद पवार

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात व्हीव्हीपॅटद्वारे मते मोजण्याच्या मागणीसाठी काल विरोधी पक्षांनी याचिका दाखल केली. या मशीनद्वारे फक्त २ टक्के मतांची मोजणी केली जाते. पण आमची मागणी ५० टक्के मतांची मोजणी या मशीनद्वारे व्हावी अशी होती. या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला येत्या २२ मार्चपर्यंत आपले म्हणणे मांडायला सांगण्यात आले असल्याचे शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रामधील काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडून येणाऱ्यास फक्त तीन महिने काम करता येणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांसाठी ही निवडणूक घेऊ नये. माझे सर्व पक्षांना आवाहन आहे की, सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा आणि उमेदवारी अर्जच भरू नयेत. किंवा निवडणूक आयोगाने ही निवडणूक रद्द केली नाहीच, तर सर्व पक्षांनी सहमतीने सामाजिक क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी.

मुंबईत काल झालेला हा अपघात अत्यंत चिंतेचा विषय आहे. विरार ते चर्चगेट, कर्जत ते सीएसटी रोज किमान १ कोटी लोक प्रवास करतात. दिवसाला १५ ते २० अपघात होतात. वर्षाला ३ हजार मृत्यू होतात. महिन्याला २-३ हजार जखमी होतात. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही बदल करण्याची गरज आहे. बुलेट ट्रेनऐवजी अगोदर रेल्वे स्टेशनांची सुधारणा करणे गरजेचे आहे. अपघातांच्या वाढत्या प्रमाणाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, बुलेट ट्रेनला सव्वा लाख कोटी खर्च करण्यापेक्षा सरकारने तो पैसा मुंबईतील लोकल सेवेवर खर्च करावा. मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कोलकाता, कोलकाता ते चेन्नई आणि चेन्नई ते मुंबई या मार्गांवरील रेल्वेचे जाळे आणखी सक्षम करायला हवे.

मुंबईतील या पडलेल्या पुलाचे ऑडिट झाले होते. पण आत त्याचीच चौकशी करण्याची गरज आहे. मध्य रेल्वेने नोव्हेंबर २०१५ मध्ये राज्य सरकारला पत्र दिले होते. त्यात मुंबईतील ओव्हरब्रिजच्या दुरवस्थेची माहिती दिलेली होती. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. सरकारने आता मुंबईतील पुलांबाबत एक श्वेतपत्रिकाच जाहीर करावी. आज अमरावतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. पण बालकांनी काही विधान केले तर ज्येष्ठांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचे नसते. मुख्यमंत्री त्यांच्या बालबुद्धीला शोभेल असेच विधान करत आहेत.

https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/229783221198994/

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)