#लोकसभा2019 : सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी झाल्याचे सर्व आरोप फेटाळले असून सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसोबत हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.

निवडणुक आयोगाने उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरीबदलचे आरोपात काहीच तथ्य नसून ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. तसेच ईव्हीएम मशीनची सुरक्षा अधिक वाढविण्यात असल्याचे देखील निवडणुक आयोगाने सांगितले आहे.

निवडणुक आयोगाने सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशच्या गाजीपूर, डुमरियागंज, झांसी आणि चंदौली तसेच बिहारच्या सारणमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये हेराफेरी करण्यात आल्याच्या तक्रारीचीं चौकशी केली असता ईव्हीएम मशीन स्ट्रांग रूममध्ये पूर्णपणे सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

मतदान झाल्यानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स उमेदवारांसमोर योग्य पद्धतीने सील करण्यात आल्या होत्या. यावेळी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेरेही होते. सीपीएफ सुरक्षा जवानदेखील उपस्थित होते. सर्व आरोप निराधार आहेत, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास अद्याप वेळ असताना सोमवारी ट्विटरवर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने गोंधळ निर्माण झाला. हे पाहता निवडणुक आयोगाने ईव्हीएम मशीनबदल स्पष्टीकरण दिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here