पंतप्रधानांविरोधात सीपीआयची निवडणूक आयोगाकडे धाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज #MissionShakti बाबतची माहिती देण्यासाठी स्वतः देशाच्या जनतेला संबोधित केल्यावरून विरोधकांमध्ये चांगलेच संतापाचे वातावरण पसरल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारतीय संरक्षण संशोधन व विकास विभाग (डीआरडीओ) आणि ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या A-SAT प्रणालीच्या यशस्वी चाचणीबाबत देशाच्या जनतेला दूरचित्रवाणीद्वारे संबोधित करताना माहिती दिली होती.

दरम्यान, पंतप्रधानांच्या या कृत्याबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियातर्फे आज केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठविण्यात आले असून या पत्राद्वारे पक्षातर्फे मोदींच्या कृतीबाबत आक्षेप नोंदविण्यात आला आहे. या पत्रानुसार, देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असून अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या जनतेला संबोधित केलं आहे. देशामध्ये सध्या आचारसंहिता लागू असून पंतप्रधान पदावर कार्यरत असलेले मोदी देखील निवडणुकांमधले उमेदवार आहेत त्यामुळे मोदींचे आजचे कृत्य हे आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे.

https://twitter.com/ANI/status/1110890475387379712

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)