मुंबई: निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ‘भाबीजी घर पर है’ आणि ‘तुझसे है राबता’ या मालिकांना नोटीस पाठवली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी काल (8 मार्च) हिंदी मालिकांवर मोदींचा प्रचार आणि भाजपचा प्रचार सुरु असल्याचा आरोप करत, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
हिंदी मालिकांमधून भाजपच्या जाहिराती व योजना अप्रत्यक्षपणे दाखवण्यात येत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. सचिन सावंत यांनी याला विरोध करत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या मालिकांवर बंदी घालावी तसेच निर्मात्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.
दरम्यान, निवडणूक आयोगाने या दोन्ही मालिकांना नोटीस पाठवली असून 24 तासांच्या आता खुलासा करा, असे बजावले आहे.