मोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या “मोदी – जर्नी ऑफ अ कॉमन मॅन” या वेब सेरीजवर देखील बंदी घातली आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेल्या “पंतप्रधान नरेंद्र मोदी” या चित्रपटावर बंदी घातली होती. देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुका सुरु असून लोकसभा निवडणुकांमध्ये कोण्या एका व्यक्तीला अथवा पक्षाला फायदा होईल असे चित्रपट निवडणुका संपेपर्यंत प्रसिद्ध केले जाऊ नयेत अशी भूमिका घेत निवडणूक आयोगाने “पंतप्रधान नरेंद्र मोदी” या चित्रपटावर बंदी घातली होती.

दरम्यान, आता याच पार्श्ववभूमीवर निवडणूक आयोगातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यवर आधारित असलेल्या “मोदी – जर्नी ऑफ अ कॉमन मॅन” या वेब सेरीजवर देखील बंदी घालण्यात आली असून याबाबत निवडणूक आयोगाने या वेब सेरीजचे प्रदर्शन व प्रसारण करणाऱ्या ‘इरॉस नाव’ कंपनीला नोटीस धाडले आहे. निवडणूक आयोगाने नोटिसीद्वारे ‘इरॉस नाव’ला आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर “मोदी – जर्नी ऑफ अ कॉमन मॅन” या वेब सेरीजचे उपलब्ध असलेले ५ भाग निवडणूक आयोगाच्या पुढच्या निर्देशापर्यंत  हटविण्याचे निर्देश दिले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1119544770932748291

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)